कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग २

तिकडे प्रियाच्या आयुष्यात एरॉन आला होता. ऑफिस मधला टीममेट आणि कॉफी ब्रेक पार्टनर असलेल्या एरॉनच्या प्रेमात प्रिया कधी पडली तिला कळलेच नाही. एका जोडीदारामध्ये असलेले जास्तीत जास्त गुण तिला एरॉनमध्ये दिसले होते. त्याच्या प्रोपोजलला  तीने लगेच होकार दिला. ह्या सुट्टीला ती येणार होती पण तिला कुमारच्या वागण्या-बोलण्यातून त्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आला होता त्यामुळे तिने मुद्दामून त्याला ती येणार असल्याचे सांगायचे टाळले.

Read – कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी  भाग १

ती रेल्वे मधून खाली उतरणार इतक्यात तिला संजय आणि कुमार तिची स्टेशन वर वाट पाहताना दिसले. तिला पाहून कुमारने मस्त स्माईल दिली पण तिचा चेहरा पडला.  तिने संजयला बॅग उचलण्यासाठी बोलावले आणि कुमार जवळ जाऊन डायरेक्ट एरॉन बद्दल सांगितले आणि ती आज तिच्या घरच्यांनासुद्धा त्याच्याबद्दल सांगणार आहे हे कुमारला लक्षात आले.

कुमारचे शुभमंगल - Lagnachi Bolni Marathi Matrimony

कुमारसाठी हे सर्व अनपेक्षित होत. काही कळायच्या आतच संजय आणि प्रिया त्याला बाय म्हणून निघून गेले आणि प्रेमभंग झालेला कुमार घराकडे चालू लागला. डायरेक्ट स्वतःच्या बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. आईला एव्हाना काहीतरी झालाय ह्याचा सुगावा लागला होता. तिने दरवाजा वाजवून चहा घ्यायला ये असे सांगितले. कुमार बाहेर आला पण तो नजर चोरतोय हे आईच्या डोळ्यातून सुटले नाही. “प्रिया नाही येणार का ह्या सुट्टीत?” आईचा प्रश्न ऐकून मात्र कुमार चा बांध सुटला आईला मिठी मारून जोरजोरात रडायला लागला आणि आईला त्याच्या मनातलं प्रियाबद्दलच प्रेम किती जास्त आहे ते सांगू लागला. आईने त्याला धीर दिला आणि तो दिवस कसाबसा घालवला. मात्र आपला मुलगा किती खचून गेला आहे याची जाणीव तिला झाली.

Register on Marathi Matrimonial Site – Lagnachi Bolni

आपल्या मुलाला ह्या यातनेतून बाहेर कसे काढायचे हाच विचार तिच्या मनात दिवसभर घोळत होता. दिवसभरात आपटे ताई दोन वेळा येऊन गेल्या पण कुमारच्या आईला त्यांच्याशी बोलायला वेळ मिळाला नाही. दुसर्या दिवशी कुमार ऑफिस ला गेल्यावर त्यांनी आपटे ताईंना बोलावले आणि त्याचा नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या आणि बघता बघता विषय कुमारच्या लग्नावर येऊन थांबला. आपटे ताईंच्या  सांगण्यावरून कुमारच्या आईने कुमारचा बायोडेटा बनवून घेतला होता आणि लग्नाचीबोलणी.कॉम वर त्याचे प्रोफाइल बनवले होते. ३-४ मुली पसंत सुद्दा केल्या होत्या. पण कुमारसमोर हा विषय कधी काढावा याचा अंदाज त्यांना येत नव्हता.

                                                                                           ——————–क्रमश: