अरेंज मॅरेज, लव मॅरेज की लिव्ह इन- एक दृष्टिक्षेप

हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक संस्कार आहे. ज्याला  गृहस्थाश्रम असं म्हटलं जात. म्हणजेच लग्न केल्यानंतर पुरुष हा गृहस्थ तर स्त्री हि गृहिणी होते. हा झाला पूर्वीचा भाग. आज २१ व्या शतकात म्हणजेच  डिजिटल युगात सर्व काही डिजिटल झालं असताना विवाह संस्थेच्या देखील व्याख्या बदलताना दिसतायेत. पूर्वी विवाह जमवताना नात्यातील अथवा घरातील वडीलधारी माणसं पुढाकार घ्यायची. एवढच काय आपला जोडीदार काळा कि गोरा, उंच कि बुटका या सर्व गोष्टी लग्नाच्या दिवसांपर्यंत देखील एकमेकाला माहित नसायच्या. आपल्या आजी आजोबांची किंवा त्या पिढीतील बहुतेक सर्वांची लग्न या पद्धतीने झालेली दिसतात. हवं तर विचारून पहा. पूर्वीचा काळच वेगळा होता. ज्याला अनेक कंगोरे होते. विवाह संस्थेबद्दल म्हणाल तर काही गोष्टी चांगल्या तर काही तेवढ्याच वाईट होत्या. उदाहरणार्थ नात्यात लग्न केल्यामुळे होणारी सदोष संतती तसेच जरठ कुमारी विवाह म्हणजेच वयातील भयंकर अंतर.

राजा महाराजांनी केलेलं स्वयंवर असेल किंवा एखाद्या राजाने एखाद्या सौंदर्यवतींशी केवळ आपली ओळख म्हणून अंगठी देऊन केलेला गांधर्व विवाह असेल; विवाह हा विषय नेहमीच मानवी आयुष्याच्या केंद्रस्थानी राहिला आहे आणि राहील. माझ्या माहितीत असलेल्या एका जमातीमध्ये तर स्त्री गरोदर असतानाच तिच्या पोटाला कुंकू लावून,  मुलगी झाली तर माझ्या मुलाशी लग्न लाव असे बुकिंग सुद्धा केले जायचे. आणि विशेष म्हणजे तसं लग्न पुढे जाऊन व्हायचं देखील.

सांगायचा मुद्दा हा आहे कि लग्न हि एक फेज आहे आणि कुटुंबव्यवस्था अथवा सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी ती तेवढीच आवश्यक आणि महत्वाची आहे. शादी का लड्डू जो खाये वो पचताये और जो ना खाये वो भी पचताये असं गमतीने म्हटलं जात.

आता वळूयात सद्यस्थितीकडे . आधी शिक्षण, मग उच्च शिक्षण तेही परदेशी, मग करिअर, त्यानंतर स्वतःच घर असलं पाहिजे, सेटल होऊयात म्हणता म्हणता तिशी कधी ओलांडली जाते हे आपलं आपल्याला कळत सुद्धा नाही. मग सुरु होते शोधाशोध. नाव नोंदवणे, मॅट्रिमोनी साईट व्हिसिट करणे आणि बरंच काही. पण खरंच हा शोध योग्य पद्धतीने घेतला जातो का ? त्याला योग्य दिशा असते का हे लग्नाळू युवक आणि युवतींनी समजून घेतलं पाहिजे. लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं होत नसतं  तर ते दोन कुटुंबांच, दोन भिन्न संस्कृतीचं आणि त्या सोबत जोडलेल्या अनेक आयुष्याचं असतं. केवळ नातेवाईक आणि समाज काय म्हणेल या भीतीने केलेला विवाह हा विवाह नसून तडजोड म्हणता येईल. आणि अशी तडजोड केल्यास त्याचे परिणाम घटस्फोटापर्यंत येऊन पोचतात.

केवळ वेळेत लग्न करणे एवढंच महत्वाचं नसून योग्य व्यक्तीशी आणि जोडीदाराशी करणं देखील तितकच महत्वाचं आहे. विचार करा आपले आई वडील ज्यांची लग्न हि एकमेकाला न पाहताच झालीत हा एक काळ आणि त्याच आई वडलांची मुलं आज आमच्या लग्नाचं आम्ही पाहतो म्हणत चक्क डेट्स वर जातात आणि बराच वेळ काढून शेवटी ”तेवढा चार्मिंग नाहीये” किंवा “he has some hygiene issues”  म्हणत चक्क नकार देतात तेव्हा बिचारे आई बाबा हीच / याच कस होणार म्हणत कपाळाला हात लावतात.

म्हणूनच लग्न जमवताना आपण मानसिक दृष्ट्या तयार आहोत कि नाही हे स्वतःशी तपासणं खूप गरजेचं आहे. एका मुलीने  तर चक्क मुलाने चांगला perfume मारला नव्हता म्हणून नकार दिला होता. मग अशा परिस्थितीत काय करायचं ? हि नाजूक  वेळ कशी निभावून न्यायची हा आजकाल ९० % पालकांसमोर असलेला मोठा प्रश्न आहे. कारण उरलेले १० % प्रेम विवाह करतात. पण आकडेवारीवर नजर टाकली तर प्रेम विवाह हे किती टिकतात हा एक वेगळा विषय होईल. जो आपण पुढच्या वेळी पाहुयात

तोपर्यंत आमची lagnachibolni.com या वेबसाईट ला नक्की भेट द्या. कारण गाठी जरी स्वर्गात बांधल्या असल्या तरी त्या शोधायला आम्ही नक्कीच तुमची मदत करू. लग्नाला बोलवायला मात्र विसरू नका !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.