कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग 3

तब्बल एका आठवड्यानंतर आज आपली कसोटी आहे असा विचार करून शेवटी तिने कुमारला मॅट्रिमोनी साईट वरून निवडलेल्या ३-४ मुलींबद्दल सांगितले. कुमारचा देवदास झालेला त्याच्या मोठ्या भावाला सुद्धा बघवले नाही त्याने कुमारला सपोर्ट म्हणून आईला थांबवले. आईला कानात पुटपुटला, अगं थोडा वेळ तरी जाऊ दे. तशी आई तोंडातल्या तोंडात बडबडत स्वयंपाकघरात गेली. कुमार हळू हळू नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होता. 

Read – कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी  भाग १

Read – कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी  भाग 2

काही तासांनी लॅपटॉप समोर ब्रॉउसर चालू दिसला आणि त्यात ४ विंडो मध्ये चार मुलींची माहिती दिसली. आश्लेषा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कामाला होती. तीने सुद्धा योग्य जोडीदार मिळावा म्हणून या मराठी मॅट्रिमोनी साईट वर रजिस्ट्रेशन केले होते. तिच्या प्रोफाइल वर अशा अनेक गोष्टी लिहिल्या होत्या ज्या कुमारला तिच्या प्रोफाइल शी बांधून ठेवत होत्या. कुमार ने आईकडे पाहून आश्लेषा ला पसंती दर्शवली. मग चहापोह्यांचा साग्रसंगीत कार्यक्रम पार पडला. कुमार ला तिच्यासोबत बोलताना तिचा स्वभाव प्रोफाइल मध्ये लिहिल्याप्रमाणे आहे हे लक्षात आले.  

Marathi Matrimonial Site - Lagnachi Bolni

इकडे आश्लेषाला सुद्धा कुमार आवडला होता. कुमारची पर्सनॅलिटी तशी चांगली होती. स्वभाव बोलका होता आणि त्याचा आईसोबत बोलून तिची सासू अशी असावी हे मनात पक्के झाले होते. तिने घरच्यांना होकार सांगितला आणि मुहूर्त ठरला.

लग्नात जश्या गडबडीत थोड्या कुरबुरी होतात त्या सोडल्या तर लग्न अतिशय मस्त झालं. कुमारने आधीपासून हनिमूनचे सगळे रिझर्वेशन  करून ठेवले होते. आणि लग्नाआधी व्हिसा काढायला दोघे सोबत गेले होते तेव्हा दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती, त्यात त्याने प्रियाबद्दल तिला सांगितले होते पण चेहर्यावरचे हावभाव अजिबात न बदलता आश्लेषाने त्याला समजून घेतले आणि त्याला सपोर्ट दिला त्यामुळे आश्लेषाबद्दल त्याचा मनात प्रेम आणि आदर वाढू लागला होता. हनिमून वरून परत येऊन रुटीन लाइफ चालू झाली आणि अश्लेषाने घरातली जबादारी अगदी योग्य पद्धतीने पेलली आणि सर्व कामे सर्वांना योग्य पद्धतीने वाटून घराचा गोडवा वाढवला आणि एकत्र कुटुंबाचा धागा बनली.सगळयांची लाडकी बनलेल्या अश्लेषामुळे घरातले वातावरण आता अजूनच प्रसन्न वाटत होते.

आज 2 वर्षानंतर ह्या फ्लॅशबॅक मधल्या गोष्टी आठवून कुमारच्या चेहऱ्यावर आपसूकच एक सुखद हास्याची लकेर उमटली. आणि त्याने तिच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णयाचे चीज झाल्यासारखे वाटले.

One thought on “कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी – भाग 3”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.