कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी

मोठ्या भावाने प्रेमविवाह केलेला त्यामुळे आपणही आपल्या मनपसंत मुलीशी विवाह करू शकतो अशी साधी सोपी गणित मांडत बसलेला कुमार आज विचारात गढून गेला होता आणि शून्यात बघत हसत असताना त्याच्या आईने त्याला हाक मारली आणि त्याचे लक्ष आईकडे गेले. आईने विचारलं, काय रे कुमार, आज मोबाइलकडे न पाहताच हसतोय, काय झालं ? अगं आई असा काही, नाही, कुमार म्हणाला आणि वेळ टाळून दिली.

आज त्याचा दिवसभराचा कार्यक्रम ठरला होता. आज तो प्रियाला भेटणार होता, दोघेही मस्त लॉन्ग ड्राईव्ह ला जाणार होते. आणि तो तिला लग्नासाठी प्रपोज करणार होता. तसाही अरेंज मॅरेज वर दोघांचा विश्वास नव्हता. २ वर्षांपूर्वी कॅजुअली चालू झालेलं हे रिलेशन आज या वळणावर येईल हा विचार सुद्धा त्याने केला नव्हता. दोघांनी नात्यात बरेच ऊन पावसाळे पहिले होते. कुमारचा स्वभाव जरा रागीट होता पण प्रियाच्या बाबतीत तो खूप पझेसिव होता. तिला त्याचा पझेसिव्हपणाचा त्रास व्हायचा पण ती त्याला बेस्ट फ्रेंड मानायची आणि त्याच्यासमोर मान मोकळं करायची. दोघे बऱ्यापैकी रोज भेटायचे. एकाच एरिया मध्ये नोकरीला असल्याने ते शक्य होते पण गेल्यावर्षी ती बेंगलोरला एका आयटी कंपनीत जॉईन झाली आणि त्यांच्या भेटी आता फक्त सण-वाराला होत होत्या.

२०१७ ची दिवाळी त्याच्यासाठी जरा जास्तच महत्वाची होती कारण प्रियाने तिला आलेल्या स्थळांबद्दलचा तिचा राग आणि जोडीदार ओळखीचा असणं किती महत्वाचं असतं याबद्दल बोलताना थकली नव्हती, आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली होती. तिला समजून घेताना त्याची परिस्थिती कुछ कुछ होता है वाल्या अंजलीची परिस्तिथी जशी “प्यार दोस्ती है” डायलॉग नंतर झालेली तशी झाली.  तो पहिल्यांदा तिला लाइफ पार्टनर च्या रोल मध्ये पाहत होता. त्याचा मनात लाडू फुटले होते. आत्ताच प्रपोज करू का या विचाराला त्याने लगेच आवर घातला.

दिवाळीनंतर ती डायरेक्ट ऑगस्टमध्ये रक्षाबंधनसाठी आलेली. तिचा भाऊ संजय आणि कुमार  चांगले मित्र झालो होतो. ती रक्षाबंधनसाठी येणार आहे हे मला त्याच्याकडून कळाले. कुमारला आश्चर्य वाटलं कारण एकदिवसाआड  १५-२० मिनिटे तरी त्यांचे बोलणे व्हायचे पण तिने ह्या व्हिसिट बद्दल काहीच उल्लेख केला नव्हता. तिला मला सरप्राईझ द्यायचे असेल असा विचार करून कुमार संजय सोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला.

                                                                                              ——————–क्रमश:

कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी  भाग 2 || कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी  भाग 3

2 thoughts on “कुमारचे शुभमंगल – अजब लग्नाची गजब कहाणी”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.