विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज

रूपा आणि अनिलचे  तावातावाने बोलणे सुरु होते. मी शांतपणे माझ्या खुर्चीत बसून त्यांचे बोलणे ऐकत होते. या दोघांचे लग्न होऊन १ वर्ष झाले, नव्याची नवलाई नऊ दिवसातच संपली आणि दोघेही स्वप्नातून वास्तवात अलगद उतरले. वर्षभरात दोघांना एकमेकांच्या उणीव चांगल्याच जाणवू लागल्या.

खरंतर या दोघांचा प्रेमविवाह. लग्नापूर्वी चांगली २ वर्षे एकमेकांना ओळखत होते, फिरत होते. पण फक्त आयुष्याच्या चांगल्या बाजू पाहुनच  प्रेमात पडलेलं जोडपं, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहायलाही तयार नव्हतं.

त्यावेळी मला विवाहपुर्व समुपदेशन किती महत्वाचं आहे ते जाणवलं. खरंतर पूर्वी सुद्धा लग्न व्हायची आणि संसार कायचेच की लोक. पण आता ज्याप्रकारे घटस्फोट  घेण्याचा वेग आणि प्रमाण वाढतेय, त्यावरून तरी ही काळाचीच गरज आहे असे वाटतेय.

विवाहापूर्वी समुपदेशनाचा  प्रांत खूपच मोठा आहे. त्यामधे सांपत्तिकस्थिती, धार्मिक विचार. तसेच तुमचे शरीर स्वास्थ्यसुध्दा महत्वाचे ठरते. “Prevention is better  than cure” या वैद्यकीय शास्त्राच्या म्हणीप्रमाणे विवाहपूर्वसमुपदेशनामुळे कितीतरी विवाहसंबंध  तुटण्यापासून वाचू शकतील.

विवाहापूर्वी  दोघांचीही वैद्यकीय तपासणी होणे महत्वाचे आहे. त्यामधे  heamogram, blood group[निगेटिव्ह की पॉझिटिव्ह], Blood sugar[मधुमेह तपासणी], lipid profile, chest x-ray, ECG या तपासण्या केल्या  जातात. तसेच fertility  test मध्ये स्त्रियांमध्ये hormonal test, ओटीपोटाचे सोनोग्राफी  केली जाते.

पुरुषांमधे सुद्धा  hormonal test व semen analysis [वीर्यातीलशुक्रजंतूचे  प्रमाण] तपासले जाते. दोघांपैकी एकालाही S.T.O [Sexually transmitted diseases], HIV, Hepatitis B virus test करून हे   संसर्गजन्य आजार नाहीत ना याची तपासणी केलीजाते.

या झाल्या लग्नाळू  मुलामुलींच्या प्रत्यक्ष  तपासण्या. परंतु काही आजार हे अनुवांशिक असतात. किंवा काही आजारात  प्रत्यक्ष ती व्यक्ती फक्त carrer असते. तीला स्वतःला या रोगाची लक्षणे दिसत नाहीत.  त्यामुळे family history घेऊन रक्तदाब, अस्थमा, अपस्मार (epilepsy), सिकल सेल anaemia व  काही मानसिकआजार आहेत का याचा आढावा घेऊन विवाहपूर्व समुपदेशन करता येते.

आजच्या काळात तरुण पिढीचे व्यसनाधीन  होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सुद्दा कलहाचे  प्रमुख कारण दिसून येते. सिगरेट, दारू, कोडीन,  डायझेपाय यासारख्या व्यसनाधीनतेचा  प्रजननक्षमतेवर, तब्येतीवर तसेच वैवाहिक  आयुष्यावर परिणाम होतो. यावर समुपदेशन आणि  वैद्यकीय चिकीत्सा उपयोगी ठरते.

सर्वात महत्वाचे पण  सर्वात दुर्लक्षित मुद्दा  म्हणजे लैंगिक शिक्षणाचाअभाव. दुर्दैवाने आपल्या समाजात हे शिक्षण  चोरून, इंटरनेट द्वारे विडिओ पाहून मिळवले जाते. ज्यामुळे त्यातील अतिरंजितपणा हेच वास्तव आहे हेच ज्ञान  मिळते. शास्त्रशुद्ध शिक्षणाने गैसमज दूर होऊन कितीतरी संसार सुरळीत होतील.

———————————————————-
-डॉ. ज्योती सुहास कदम.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s