योग्य जोडीदार कसा निवडावा ?

तसं म्हणायला गेलं तर हा प्रश्नच अवघड आहे. कोणी म्हणेल की या प्रश्नला उत्तरच नाहीये, हा तर योगायोग असतो. पण असं म्हणणे हार माण्याजोग आहे.
जोडीदार निवडण्यासाठी आधी तुम्हाला तुम्ही स्वतः कोण आहात व जीवनातील तुमच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणे गरजेच आहे. तुम्हाला कोण आवडते हे जितक महत्वाचं आहे, तितकच महत्वाच आहे कि तुमच्यासाठी कोण योग्य आहे. तुमच्यासाठी योग्य कोण हे तुम्ही स्वतः खूप चांगल्याप्रकारे शोधू शकाल.

यात खालील प्रश्न तुम्हाला मदत करतील, या प्रश्नांची स्वतःशी प्रामाणिक राहून उत्तरे शोधा.

तुमची ध्येय ठरवा .
– तुम्हाला कोणत्या प्रकारची जीवन शैली जगायला आवडेल?
– लग्नानंतर तुम्हाला नोकरी/Business करायचाय की घर संभाळायचंय?
– नोकरी किंवा business मधील तुमची ध्येय काय आहेत? तुमची आर्थिक ध्येय काय आहेत?
– तुम्हाला कुठे राहायला आवडेल, ज्या शहरात तुम्ही आहात, दुसऱ्या शहरात, भारतात किंवा भारताच्या बाहेर? कुठे राहायला तुम्हाला आवडणार नाही ?
– तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये रहायला आवडेल की स्वतंत्र.
– तुम्हाला मुलं हवीत का आणि हवीत तर कधी व किती हवीत.

याची उत्तरे शोधून ती लिहून ठेवा किंवा पक्की लक्षात ठेवा. तुमची उत्तरे पुढील व्यक्तीला बघून कमीत कमी बदलतील याची काळजी घ्या.

जेव्हा तुम्ही कोणा व्यक्तीस लग्नाच्याबोलणी साठी भेटता, तेव्हा या प्रश्नासाठी त्याची काय उत्तरे आहेत ते तुम्ही जाणून घेऊन, तुमचा निर्णय घेऊ शकाल.
प्रश्न विचारतानाच किंवा पुढील व्यक्तीने उत्तर दिल्या नंतर तुम्ही तुमच उत्तर त्याना सांगणे गरजेचे आहे.
उ.दा जर प्रश्न असा असेल की तुम्हाला एकत्र कुटुंबामध्ये रहायला आवडेल की स्वतंत्र? तर तुम्ही असही विचारू शकाल की मी एकत्र कुटुंबात राहू इश्च्छितो/इश्च्छिते, तुम्हाला काय वाटते? प्रश्नाचा उत्तरे हो किंवा नाही मध्ये देण्यापेक्षा, सविस्तर द्यावीत. म्हणजे तुम्हाला एकत्र / स्वतंत्र कुटुंबात का राहायचे आहे?

तुमच्या पहिल्या काही भेटींमध्ये जास्तीतजास्त बोलणी आणि प्रश्न विचारल्याने निर्णय घेण्यास निष्चित मदत होते. जेव्हा तुम्ही पुढच्या व्यक्तीबरोबर या बाबतीत बोलाल तेव्हा त्या व्यक्तीलाही तुम्ही त्या व्यक्तीसाठी योग्य आहात की नाही हे समजण्यास मदत होईल.

मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मुलांच्या त्याच्याकडून अपेक्षा असतात की त्यांनी घर सांभाळावे, नोकरी करावी. परंतु ते हे विसरतात की लग्नाआधी मुलीही शिक्षण घेत असतात आणि त्यांना घरकाम आणि स्वयंपाक शिकायला तितकासा वेळ मिळालेला नसतो. जर मुलींकडून नोकरीची अपेक्षा असेल तर घरकामाच्या अपेक्षा थोड्या कमीच ठेवायला हव्यात.

तुम्हा दोघांचे स्वभाव आणि सवयीं ही जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या चांगल्या व वाईट सवयी जाणून घेऊन त्या एकमेकांना कळूद्या. ज्या वाईट सवयी तुम्ही सोडू शकणार नाहीत त्या पुढच्याला नक्की सांगा. ज्या तुम्ही नक्की सोडणार आहात त्या नाही सांगितल्या तरी चालू शकेल. स्वतःशी आणि पुढच्यांशी प्रामाणिक राहिलात तरच तुमच्या नात्याची वाटचाल सुखकर होईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.